पत्नी Instagram वर Boyfriend बरोबर करायची अश्लील चॅट; पतीने तिला रंगेहाथ पकडलं अन्...
Crime News: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस दोघांचा संसार अगदी छान सुरु होता. मात्र अचानक नवऱ्याच्या हाती असं काही लागलं की त्यावरुन भांडणं होऊ लागली.
Wife Cheated On Husband: उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील एका महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर एक वेगळाच राडा झाला आहे. पीडित पतीने त्याची पत्नी इन्स्टाग्रामवरुन तिच्या प्रियकराबरोबर अश्लील चॅट करते असा आरोप केला आहे. या दोघांना आपण चॅट करताना रंगेहाथ पकडल्याचा दावाही या पीडित पतीने केला आहे. मात्र पतीने या पत्नीला चॅट करताना पकडल्यानंतर तीने आपली चूक मान्य करण्याऐवजी नातेवाईकांच्या मदतीने सासरच्या लोकांना मारहाण केल्याने प्रकरण चांगलेच तापले. या प्रकरणी पीडित पतीने थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तर पत्नीने पतीवर हुंड्याची मागणी करतो, मारहाण करतो यासारखे गंभीर आरोप केले आहेत.
सासू-सासऱ्यांनी केला समजवण्याचा प्रयत्न
मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी 2023 मध्ये अमरोहा गावात राहणाऱ्या एका मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न झालं. लग्नानंतर पहिले काही दिवस सर्वकाही ठीक सुरु होतं. मात्र नंतर आमची सून एका तरुणाशी इन्स्टाग्रामवरुन चॅट करु लागली असं या वृद्धाने सांगितलं. या तरुणीने पत्नीने अशाप्रकारे रात्री अपरात्री मित्राशी फोनवरुन चॅट करण्यास विरोध केल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. अनेकदा या मुद्द्यावरुन दोघांमध्ये भांडणं व्हायची. सासू-सासऱ्यांनीही या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या शब्दांना फारशी किंमत न देता ही महिला तिच्या मित्राबरोबर चॅट करत राहिली.
घरात घुसून मारहाण
अचानक एक दिवस या विवाहित महिलेच्या माहेरचे लोक आले आणि तिला माहेरी घेऊन गेले. यानंतरही हे प्रकरण शांत झालं नाही. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता या माहिलेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या लोकांना घरात घुसून मारहाण केली. या महिलेच्या पतीबरोबरच तिच्या आई-वडिलांना मारहाण करण्यात आली. तसेच या तिघांना या महिलेच्या माहेरच्यांनी धमकावलं. यानंतर पीडित पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कलम 352, 323, 504, 506, 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पत्नीने सासरच्या लोकांविरोधात हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस सध्या तपास करत आहेत. असून मुळात मारहाण का झाली? ही महिला ज्या तरुणाबरोबर बोलत होती तिचा बॉयफ्रेण्ड आहे का? लग्नापूर्वी या दोघांमध्ये काही संबंध होते का याबद्दल पोलीस तपास करत असून सध्या दोन्ही बाजूच्या तक्रारी दाखल करुन घेण्यात आल्या आहेत.