आई आणि मुलीचा बॉयफ्रेंड एकच; लग्नासाठी दबाव आल्यावर असं काही केल की पोलिसही हादरले
उत्तर प्रदेशात एका तरुणाचे आई आणि मुलगी दोघींंशी प्रेमसंबध होते. अखेरीस त्याने एकीचा काटा काढला.
Up Crime News : उत्तर प्रदेशात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचे त्याची प्रेयसी तसेच तिच्या आईसोबत देखील प्रेमसंबध होते. मात्र, ज्यावेळेस लग्नासाठी दबाव आला तेव्हा त्याने असं काही केले त्याला प्रेयसीचा बळी द्यावा लागला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिस देखील हादरले.
नेमकं आहे काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता धक्कादायक माहिती समोर आली. या तरुणीचा मृत्यू गळफास घेण्याआधीच झाला होता.
हत्या करुन मृतदेह फासावर लटकवला
शवविच्छेदन अहवालात या तरुणीची गळा दाबून हत्या करुन करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या तरुणीची गळा दाबून हत्या करुन तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आला. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
प्रियकारानेच केली हत्या
मृत तरुणीच्या प्रियकरानेच तिची हत्या केली. सुनील गौर असे आरोपीचे नाव आहे. सुनील गौर प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सुनील गौर याने प्रेयसीची हत्या केली. यानंतर त्याने प्रेयसीचा मृतदेह फासावर लटकवला आणि ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा बनाव रचला. मात्र, आरोपी शेवटी पकडला गेलाच.
आरोपीचे त्याच्या प्रेयसीच्या आईशी देखील होते प्रेमसंबध
आरोपीचे त्याच्या प्रेयसीच्या आईशी देखील प्रेमसंबध होते अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. प्रेयसीमुळे आरोपीची तिची आईशी ओळख झाली. आरोपीचे एकाचवेळी दोघींशी प्रेमसंबध सुरु होते. प्रियकारते आपल्या आईसोबत प्रेमसंबध असल्याचे समजताच तरुणीला मोठा धक्का बसला. तिने प्रियकाकडे लग्नाचा तगादा लावला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने प्रयेसीची गळा दाबून हत्या केली. तपासादरम्यान आरोपी पोलिसांच्या हाती लागला. यावेळी त्याने दोघींसोबत प्रेमसंबध होते. यामुळे लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.