लखनऊ | उत्तर प्रदेशात भाजपला (BJP) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (UP ELEction 2022) मोठा धक्का बसला आहे. भाजप आमदाराने नाराजी व्यक्त करत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आगरा जिल्ह्यातील फतेहबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र वर्मा (Jitendra Verma) यांनी राजीनामा दिला  (Jitendra Verma Resign)  आहे. जितेंद्र वर्मा यांनी भाजपला रामराम करत समाजवादी पक्षाचा (Samajwadi Party) हात धरला आहे. (uttar pradesh election 2022 fatehabad assembely constituency bjp mla jitendra verma give resign joins samjwadi party entry)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र वर्मा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. "मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकार करावा", असं वर्मा यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिलं आहे. 


राजीनामा दिल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया


"मी भाजपसाठी काम केले पण तरीही मला तिकीट नाकारलं गेलं. भाजपने तरूणांना प्रोत्साहन देणार असं म्हंटलं होतं. मात्र त्यांनी 75 वर्षांच्या व्यक्तीला उमेदवारी दिली. यूपीमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन होणार असून आम्ही लोकांच्या हितासाठी काम करू", अशी प्रतिक्रिया जितेंद्र वर्मा यांनी एएनआयसोबत बोलताना दिली.


यूपीत निवडणुका केव्हा?


यूपीत एकूण 403 विधानसभा मतदारसंघ आहेत. यूपीत एकूण 7 टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14,20, 23, 27 फेब्रुवारीला पहिल्या 5 टप्प्यातील मतदान पार पडेल. तर 3 आणि 7 मार्चला अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या टप्प्यासाठी उमदेवाराचं भवितव्य मतपेटीत बंद होईल.