UP Exit Poll 2022 :  उत्तर प्रदेश निवडणुकीत  (Up Elections 2022) कोणता पक्ष बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांसाठी सात टप्प्यात मतदान झालं. 10  मार्चला उत्तर प्रदेशचं युद्ध कोण जिंकतं हे स्पष्ट होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी आज Exit Poll चे निकाल हाती आले आहेत. झी मीडियाच्या Exit Poll आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्य भाजपाला 223-228 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पक्षाला 138 - 157 जागा मिळतील.


उत्तर प्रदेशमध्ये बसपाला 5 - 11 तर काँग्रेसला 4 - 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार सत्तेत येण्याची चिन्ह आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जोर लावला होता. 


प्रचारसभेत जोरदार आरोप प्रत्योराप पाहिला मिळाले. भाजप आणि सपात चुरशीची लढत झाली. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. आता सुरुवातीच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी पुन्हा भाजपला कौल दिल्याचं दिसून येत आहे. तर समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


उत्तर प्रदेशमध्ये भाजप पहिल्या स्थानावर असला तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 जागांपैकी तब्बल 312 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. त्यावेळी मोदी लाटेचा फायदा उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला झाल्याचं बोललं गेलं.  


पण गेल्यावेळी मिळालेल्या जागांपेक्षा यावेळी भाजपाला जवळपास 70 ते 90 जागांचा फटका बसताना दिसत आहे.