Crime News : केरळमध्ये धनलाभासाठी नरबळी दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अद्यापही देशात अंधश्रद्धा (Superstition) किती घट्ट पाय रोवून उभी याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली होती. झटपट श्रीमंत होण्यासाठी दोन हत्या करण्यात आल्या होत्या. यासोबत आरोपींने मृतदेहाचे मांस देखील खाल्ल्याचे समोर आले होते. 21व्या शतकातही असे प्रकार घडणे म्हणजे समाज अद्याप किती मागास आहे याचीच जाणीव करुन देतो. केरळसारख्या सर्वात जास्त साक्षरता असलेल्या राज्यातच हा सर्व प्रकार घडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेशध्येही (Uttar Pradesh) अंधश्रद्धेतून बापानेच मुलांना संपवून आत्महत्या केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांची हत्या करत स्वतःला संपवलं


उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधील डायोरिया काला येथील रामभोजा गावची बुधवारची सकाळ ही सर्वांनाच हादरवणारी ठरली. गावातील सायकल मेकॅनिक असलेल्या बालकराम कश्यपचा मृतदेह त्याच्या घरात फासावर लटकलेला अवस्थेतत आढळून आला. यासोबत त्याच्या दोन मुलांचेही मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शवविच्छेदनानंतर वडिलांनीच मुलांची गळा दाबून दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वाद आणि अंधश्रद्धेतून वडिलांनी दोन्ही मुलांची हत्या करत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. 


'त्या' पत्रामुळे गावात दहशत


बालकरामजवळ सापडलेल्या चार पानांच्या पत्रातून हा संशय आणखी बळावला आहे. पत्नी आणि चार मुलांसह बालकराम राहत होता. दोन दिवसांपूर्वी पत्नी एका मुलाला घेऊन नातेवाईंकाकडे गेली होती. त्यानंतर संध्याकाळी बालकरामने तिन्ही मुलांसह जेवण केले आणि सर्व जण झोपी गेले. त्यानंतर एका मुलाला बालकरामने दुसऱ्या खोलीत पाठवले. पण जेव्हा सकाळी तो मुलगा उठला तेव्हा त्याला बाजूला त्याचे भाऊ बहिण निपचित अवस्थेत पडल्याचे दिसले. त्याने वडिलांचा शोध घेतला असता ते दुसऱ्या खोलीत फासावर लटक्याचे त्याला आढळून आले. पोलिसांना बालकराम जवळ आढळलेल्या चार पानांच्या पत्रामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालय.


मला कोणीच रोखू शकत नाही


बालकरामजवळ मिळालेल्या चार पानी पत्रात त्याने अंधश्रद्धेतून हे कृत्य केल्याचा पोलिसांनी संशय आहे. "जर कोणी या कुटुंबाला त्रास दिला तर मी त्यांना शांतपणे जगू देणार नाही. माझा बदला आता पूर्ण झालाय. मला रोखायचा कोणी विचार करत असेल तर असा कोणी मांत्रिक किंवा संत नाही. बालकरामही सगळं काही करुनही परिस्थितीसमोर हरला होता, असा मजकूर या पत्रात लिहीलाय. त्यामुळे हे पत्र बालकरामने स्वतः लिहीले की त्याला कोणी लिहायला लावले याबाबत अद्याप माहिती मिळालेले नाही. त्यामुळे या हत्येचे गूढ कायम आहे.