लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेत 17 ओबीसी जातींना एससी वर्गात समाविष्ट केले आहे. योगींचा हा निर्णय यूपीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने कश्यप, कुम्हार आणि मल्लाह सारख्या ओबीसी जातींना एससी अंतर्गत आणले आहे. निषाद, बिंद, मल्लाह, केवट, कश्यप, भर, धीवर, बाथम, मछुआरा, प्रजापति, राजभर, कहार, कुम्हार, धीमर, मांझी, तुरहा, गौड या जातींचा यात समावेश आहे. यांच्या परिवारांना जातीचे प्रमाणपत्र  देण्यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना या देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश सरकारच्या या मोठ्या निर्णयावर सपा किंवा बसपातर्फे कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आली नाही. या आधीच्या सरकारनेही अशा प्रकारचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हाची सरकारे निर्णयापर्यंत पोहोचू शकली नव्हती. योगी सरकारने या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.



निर्णय भाजपासाठी महत्त्वाचा 


उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची वेळ आहे. भाजपा आपल्या पद्धतीने तयारीला लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे लक्ष हे गैर जाटव मतांकडे आहे. हे मतदार गेल्या निवडणुकीत भाजपाकडे आले होते. या मतदारांना पूर्णपणे आपल्याकडे आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.