लखनऊ : Gyanvapi Mosque Row  : ज्ञानवापी मशिद प्रकरणात आता उत्तर प्रदेश सरकारने उडी घेतली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या शासकीय अधिवक्त्यांनी जिल्हा न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. यात त्यांनी तीन मागण्या नोंदवल्या आहेत. वुझूखान्यातला नळ हटवावा, वुझूखान्यातील टॉयलेटचीही अन्यत्र व्यवस्था करावी, तसंच वुझू तलावात असलेल्या माशांची अन्यत्र सोय करावी या तीन मागण्या कोर्टापुढे करण्यात आल्या आहेत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील  एक भाग न्यायालयाने  सील करण्याचे आदेश दिलेत. यामुळे मालेगावमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेत. न्यायालयाच्या आदेशाच्या निषेधार्थ मालेगावात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रात्री साडे अकराच्या सुमारास मालेगावच्या खयाबान निषाद चौकात जोरदार निदर्शन करण्यात आली.  पोलिसांनी आंदोलकांना 149 प्रमाणे नोटिसा बजावल्या 


ज्ञानवापी मशीद प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना भाविकांनी काशी विश्वनाथ मंदिरात गर्दी केलीय. ज्ञानवापी सर्वे सुरू असताना मंदिराचे काही गेट बंद करण्यात आले होते. सर्वे पूर्ण झाल्यानंतर मंदिराचे दारे खुली करण्यात आली. ज्ञानवापी मशिदीपाठोपाठ आता कर्नाटकातल्या एका मशिदीचा वाद समोर येण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील जामीनाय मशिद ही टीपू सुलतानच्या काळात बांधण्यात आली. मात्र ही मशीद अंजनेय मंदिराच्या जागेवर बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. याचे ऐतिहासिक पुरावेही असल्याचा दावा केला जात आहे. 


ज्ञानवापीत शिवलिंग आढळल्याच्या बातमीनंतर आता उज्जैनच्या मशिदीबाहेरही खडा पहारा लावलाय. उज्जैनच्या पाया नसलेल्या मशिदी या शिवलिंग, गणेश प्रतिमा आणि जलाधारी असल्याचा दावा करण्यात आलाय. महामंडलेश्वर अतुलेशानंद महाराजांनी कोर्टाची सुट्टी संपताच याचिका दाखल करु असं म्हटलंय.उज्जैन मशिदीत हनुमान चालिसाची तयारी सुरु झाली आहे.


तर दुसरीकडे वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वजुखान्यातील हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा करण्यात सहायक कोर्ट कमिश्नर अजय प्रताप सिंह यांनी केलाय. मात्र या कथित शिवलिंगावरुन दोन्ही पक्षांनी दावे प्रतिदावे केलेत. हिंदू पक्षानं हे शिवलिंग असल्याचा दावा केलाय. तर  मुस्लीम पक्षानं हा कारंजा असल्याचा दावा केलाय.