हद्दच केली राव ! सरकारी कर्मचाऱ्यांनी आधी शालेय पुस्तके चोरली, नंतर ती रद्दीत विकली
UP: हापूर येथील गढमुक्तेश्वर बीआरसी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मुलांना वाटण्यासाठी आणलेली पुस्तके चोरून रद्दीत विकली. कारमधील 22 बंडल विकण्यासाठी आरोपी रद्दी यार्डमध्ये गेले होते.
UP : उत्तर प्रदेशातील हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सरकारी शाळांमध्ये मुलांना देण्यात येणारी पुस्तके विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही पुस्तके कर्मचाऱ्यांनीच विकली.
२०२२-२३ च्या प्राथमिक व पूर्व माध्यमिक वर्गाच्या नवीन वह्या विकून पैसे मिळवायचा हेतू पुस्तके चोरी करत होते. मात्र तैनात पोलिसांनी खबरदारी घेत या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. दोन्ही कर्मचारी गडमुक्तेश्वर बीआरसी कार्यालय ब्रिजघाट येथे कार्यरत आहेत.
या सरकारी शाळेत मुलांना आठवीपर्यंतची पुस्तके वाटपासाठी आली होती. मात्र याच सरकारी कर्मचाऱ्यांनी रद्दीच्या दुकानात ही पुस्तके विकली. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक वर्गाच्या 2022-23 च्या सत्रासाठी नवीन पुस्तके चोरली आणि पैसे मिळवण्यासाठी पुस्तके विकली गेली.
घटनेची माहिती मिळताच गटशिक्षण अधिकारी पंकज चतुर्वेदी रात्री उशिरा बुलंदशहरहून गढमुक्तेश्वरला पोहोचले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुस्तकांची मोजणी आणि तासाभराच्या चौकशीनंतर दूध का दूध आणि पानी का पानी झाले.
दोन्ही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
मुख्य प्रभारी कर्मचारी देवेंद्र चौहान आणि एबीएसए गढमुक्तेश्वर पंकज चतुर्वेदी यांच्या शिफारशीवरून परवेझ आणि प्रशांत (चोरी केलेले कर्मचारी) यांच्यावर बहादूरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर शाळेत मुलांना वाटप करण्यासाठी पुस्तके आली असताना तेथील मुख्याध्यापकांनी पुस्तकांचे वाटप का केले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकोशी करत आहेत.