हमीरपूर: एका चिमुकल्याला उधारी ठेवणं जीवावर बेतलं आहे. सख्खा मित्र वैरी ठरला आहे. 60 रुपयांसाठी उधारी महागात पडली आहे. पोलिसांनी 13 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला अटक केलं आहे. आरोपी आणि मृत दोघेही मित्र होते, या प्रकरणात, 13 वर्षीय मित्राने त्याच्या 11 वर्षांच्या मित्राला 60 रुपये उधार मागितले होते. ते पैसे परत न दिल्याच्या रागातून त्याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी 13 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्या करून या चिमुकल्याचा मृतदेह झाडीमध्ये फेकून दिला होता. जुगारात 60 हरल्यानंतर मागितल्यावरून वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचला आणि मित्रानेच हत्या केली. पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपी अल्पवयीन मुलाने आपला गुन्हा कबूल केला आहे. दोन दिवसांपूर्वी कांशीराम कॉलनीजवळ जंगलात एक विकृत अवस्थेत मृतदेह सापडला होता, त्याची ओळख पटली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.


पोलिसांच्या चौकशी दरम्यान ते आरोपी मित्रापर्यंत पोहोचले. अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आमची मैत्री 4 महिन्यांपूर्वी झाली. एक दिवस घरच्यांनी सामानासाठी 60 रुपये दिले होते. तेव्हा मित्रांसोबत जुगार खेळायला बसले. सामानाचे पैसे जुगाराला लावले आणि खेळात हरले. त्यावरून वाद झाला. घरी सामान देखील पोहोचवायचं होतं. त्यासाठी मी 60 रुपये उधार घेतले होते. 


60 रुपये परत करण्यासाठी मित्र तगादा लावत असल्याचं अल्पवयीन आरोपीनं सांगितलं. पैसे परत मिळवण्यासाठी त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी मी त्याला जंगलात घेऊन गेलो आणि त्याचा काटा काढला. आपला गुन्हा कबूलकरत केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.