लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची सोमवारी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी लखनऊमध्ये (Lucknow) बैठक घेतली आणि नंतर सर्व मंत्र्यांसोबत डिनरही केलं. पण या भेटीआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका ट्विटने नवी चर्चा सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातील नवाबांचे शहर असलेल्या लखनऊचे नावही बदलले जाईल, असे संकेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना सीएम योगी यांनी ट्विटमध्ये लिहिले होतं, शेषावतार भगवान श्री लक्ष्मणजींच्या पवित्र नगरी लखनऊमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आणि अभिवादन. या ट्विटमध्ये नाव बदलण्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नसला तरी हे बदलाचे संकेत मानले जात आहेत. 


योगींनी 'लक्ष्मणाची पवित्र नगरी' असं लिहिल्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. अनेकांनी लखनऊचं नाव बदलल्यास नवीन नावांचाही विचार केला आहे. लक्ष्मणपुरीपासून लक्ष्मणनगरपर्यंत अनेक नावांची चर्चा सुरू आहे. सरकारने किंवा कोणत्याही मंत्र्याने अशी कोणतीही घोषणा किंवा शक्यता व्यक्त केलेली नाही.


उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अनेक ठिकाणांची नावं बदलल्याने लखनऊचंही नाव बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी योगी सरकारने नैनी परिसराचं नाव बदलून अटलबिहारी बाजपेयी नगर, विमानतळाचं नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय विमानतळ आणि ओव्हर ब्रिजचं नाव श्यामा प्रसाद मुखर्जी असं करण्यात आलं आहे.


याआधीही अलाहाबादला प्रयागराज, फैजाबाद हे अयोध्या झालं आहे. आता यात लखनऊ शहराची भर पडण्याची शक्यता आहे.