Yogi Adityanath 2.0  : नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवला. 403 जागांपैकी भाजपने 255 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) 'पुन्हा येणार' हे पक्कं झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ कधी घेणार याची सर्वांना उत्सुकता होती. आता ती तारीख आणि वेळही ठरली आहे. योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 


25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं जाण्याची शक्यता आहे.


45 हजार लोकांची उपस्थिती?
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला 45 हजार लोक उपस्थित राहू शकतात अशी माहिती मिळतेय. याशिवाय या कार्यक्रमासाठी 200 व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर येणारे पहिले मुख्यमंत्री
उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील, जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असं घडलेलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत, पण त्यापैकी एकानेही पहिल्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. 


5 वर्षे पूर्ण करून सत्तेत परत 
2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Uttar Pradesh CM) झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करणार आहेत.