UP Police Constable Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारे रिल्स कधीकधी तुम्हाला अडचणीतही आणू शकतात. असाच एक प्रकार एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी स्टंट करणे हे किती धोकादायक आहे हे तर आपण सगळेच जाणता. पण त्याचबरोबर कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी स्टंट केल्यास शिक्षा केली जाऊ शकते. मग ते सामान्य नागरिक असो किंवा कोणीही अधिकारी. सगळ्यांनाच नियम सारखे असावेत. अलीकडेच उत्तर प्रदेश पोलिस दलातील एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पोलिसाने वर्दीत बाईकवर स्टंट केला आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा पोलिस अडचणीत सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरखपूर येथे तैनात असलेल्या कॉन्स्टेबल संदीप कुमार चौबे यांनी वर्दीत एक रेसिंग बाइकवर स्टंट व्हिडिओ केला होता. या व्हिडिओत काही संवाददेखील होते. या व्हिडिओत, एक मुलगी पोलिस कर्मचाऱ्याला विचारते तुम्ही शत्रूंना घाबरत नाही का?. त्यावर उत्तर देताना तो म्हणतो ती, शत्रूंना काय घाबरायचं... आज नाही तर उद्या मरण येणारच आहे आणि कोणाला घाबरायचचं अशेल तर देवाला घाबरा. या जनावरांना काय घाबरायचं?, असं तो व्हिडिओत बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेत तीव्र निषेध नोंदवला होता. 


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षक एसएसपी डॉ. गौरव ग्रोवरने यासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणी तपास केल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कॉन्स्टेबर संदीप कुमार चौबे यांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांकडून जारी केलेल्या 8 फेब्रुवारी 2023 रोजीच्या गाइडलाइनुसार त्यांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे समोर आले आहे. 



पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई


पोलिसांनी जारी केलेल्या गाइडलाइननुसार पोलिस कर्मचारी सोशल मीडियावर खासगी फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करु शकत नाही. दरम्यान संदीप कुमार चौबे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडून फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे किंवा अपलोड करणे यास मनाई करण्यात आली आहे. तसं असले तरी अनेकजणांकडून या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. अनेकदा असे प्रकार समोर आले आहेत.