Uttar Pradesh Police : उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. पोलिसांना जेवणाच्या वेळा देखील नीट पाळता येत आहे. अशातच वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ते पाळावेच लागतात आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये एका प्रशिक्षणार्थी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने एका हवालदाराला त्याचे जेवण अर्धवट सोडून कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिले. तिथल्याच एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला होता. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी त्या व्हिडीओवरुन अधिकाऱ्यावर टीका करण्यास सुरुवात केली.


पत्रकार पियुष राय यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'प्रशिक्षणार्थी आयपीएस शुभम अग्रवाल सध्या आझमगडचे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून तैनात आहेत. त्यांनी एका हवालदाराला जेवण अर्धवट सोडून ड्युटीला परत येण्याचा आदेश दिला, असे पियुष राय यांनी सुरुवातीला म्हटलं. 


त्यानंतर त्याच व्हिडीओखाली कमेंट करत पदावरील शिस्त पाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही केल्याचे मला पूर्णपणे मान्य आहे. पण हे वर्तन अस्वीकार्य आहे. वृद्ध हवालदार जेवत असताना सार्वजनिक ठिकाणी आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर त्याल्या अपमानित केले गेले. परिस्थितीला सामोरे जाण्याचे 100 मार्ग असल्यास, प्रशिक्षणार्थी आयपीएस सर्वात वाईट मार्ग निवडला, असे म्हटलं आहे.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आझमगडमध्ये आले असताना शुभम अग्रवाल ड्युटीवर होते. यावेळी त्यांनी जेवण सोडून हवालदाराला ड्युटीवर जाण्यासाठी सांगितले.



काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?


व्हिडिओमध्ये एक हवालदार जेवत असल्याचे दिसत आहे. तेव्हा शुभम अग्रवाल, "मी तुला वर जेवायला बोलावलंय का? ताट इथेच ठेव. लाज वाटत नाहीस, ड्युटीवर आला आहात. थोड्या वेळाने जेवा," असे म्हणतात. शुभम अग्रवाल यांच्या आदेशानंतर तो हवालदार ताट खाली ठेवतो आणि त्याचे हात धुतो.