उत्तर प्रदेश (Uttar pradesh) सरकारमधील (Yogi goverment) कॅबिनेट मंत्री संजय निषाद (Sanjay Nishad) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान संजय निषाद (Sanjay Nishad) रागाच्या भरात माईक फेकताना दिसत आहेत. भाषण करताना काही कार्यकर्ते मध्येच बोलू लागल्याने संजय निषाद संतापले, त्यानंतर त्यांनी हे धक्कादायक कृत्य केले. उत्तर प्रदेश सरकारमधील (Uttar pradesh) मत्स्यव्यवसाय मंत्री डॉ.संजय कुमार निषाद मऊ येथील एका कार्यक्रमात भाषण करताना संतापल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांवर ओरडतच मंत्री संजय निषाद यांनी मंचावरच माईक (Mike) फेकला. मऊ जिल्ह्यातील हिंदी भवन सभागृहात कार्यकर्त्यांच्या मंडलस्तरीय बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, अचानक स्टेजवर (Stage) एका कार्यकर्त्याने मोबाईलवर (Mobile) बोलायला सुरुवात केली. भाषणाच्या मध्येच कार्यकर्ता बोलल्याने मंत्री संजय निषाद (Sanjay Nishad) भडकले. (Uttar pradesh Yogi goverment minister sanjay nishad throws mic)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मऊ येथे पोहोचलेल्या कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांच्याकडे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या मध्यभागी पुरानंतर सरकारकडून (Yogi goverment) मदत न मिळाल्याची तक्रार केली. यामुळे कॅबिनेट मंत्री संतप्त झाले आणि त्यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत आमच्यापेक्षा मोठा नेता असेल तर बोला, नाहीतर ऐका, असे सांगितले. यानंतर त्यांनी घेतलेल्या हातातील माईक (Mike) फेकून दिला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी जोरदार टीका केली आहे. 


मच्छिमारांची यापुढे उपेक्षा केली जाणार नाही. त्यांना स्वतंत्र केले जात आहे. या क्रमाने चंदौली येथे अत्याधुनिक मासळी बाजार विकसित होत आहे. बनारस हे मत्स्यव्यवसाय केंद्र म्हणून संपूर्ण देशासाठी आदर्श बनवणार असल्याचे मंत्री संजय निषाद म्हणाले. मच्छीमार समाजातील मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रत्येक मंडळात निवासी शाळा बांधण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती निषाद यांनी  दिली. मच्छीमारांसाठी विम्यासह किसान क्रेडिट कार्डच्या धर्तीवर 1.60 लाख कर्जाची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



दरम्यान या वादानंतर निषाद यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. चुकून हा कार्यक्रम इथे आयोजिक करण्यात आला. इथे पूर आहे आणि याठिकाणी कार्यक्रम आयोजित करायला नको होता असे निषाद म्हणाले. उत्तर प्रदेश जिल्ह्यातील अनेक राज्यांना पुराने वेढलं आहे. अशातच हार, मुकूट घालून निषाद यांचे स्वागत करण्यात आल्याने यावरुन टीका केली जात आहे.