हत्या की आत्महत्या? मंदिर परिसरात आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह
शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ दिली पण प्रेमीयुगुलाची हत्या की आत्महत्या हे गूढ अजूनही कायम
अमित अग्रवाल, झी मीडिया, बदायू : एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एकमेकांसोबत सात जन्म साथ देण्याचं वचन निभावण्याचं स्वप्न रंगवलं. पण जात दोघांच्या मध्ये आली आणि ही सगळी स्वप्न अपूर्णच राहिली. जगण्यामरण्याच्या या प्रेमी युगुलानं आणाभाका घेतल्या. या युगुलाने शेवटचा श्वासही एकत्रच घेतला.
प्रेमीयुगुलाचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर दोन वेगवेगळे तर्क समोर आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या प्रकरणी हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रेमीयुगुल मंदिरात भेटायचे. त्यामुळे त्यांना कुणीतरी घरच्यांपैकी पाहिलं असेल आणि त्यांचा काटा काढला असावा असा एक संशय आहे.
दुसरा संशय म्हणजे दोघंही वेगवेगळ्या जातीचे असल्याने आणि अल्पवयीन असल्याने त्यांना विरोध असावा त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा असा दुसरा संशय आहे.
प्रेमीयुगुलाने मंदिरात गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. पुजारी नेमी दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या आईने मंदिरात पहिल्यांदा अशा अवस्थेत त्यांना पाहिलं. तिथल्या पुजारीने दिलेल्या माहितीनुसार दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मात्र घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी हे पाऊल उचललं असावं असा अंदाज आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बदायू इथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.