मुंबई : 'तेनू ले के मै जावांगा....', असं गाणं वाजू लागलं की लगेचच डोळ्यांसमोर कोणा एका नवरदेवाची प्रतिमा समोर येते. एखादा विवाहसोहळा म्हटलं की लगबग, पाहुणे मंडळी, अनेकांचीच ये-जा असं चित्र पाहायला मिळतं. पण, हवामानातील बदलामुळे विवाहसोहळ्यासाठीच निघालेल्या एका नवरदेवाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाचा माहोल, एकंदर उत्साही वातावरण अशा चित्राची प्रचिती आली आहे, उत्तराखंडमध्ये. तापमान कमालीचं थंड झालेलं असताना आणि सर्वत्र बर्फाचीच चादर पसरललेली असताना उत्तराखंडमधील एका नवरदेवाने त्याच्याच लग्नसोहळ्यासाठी असं काही केलं की, त्याचीच चर्चा सोशल मीडियापासून इतर अनेक ठिकाणांपर्यंत सुरु आहे. 


'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील ही घटना. ज्या ठिकाणी बिजरा येथे होणाऱ्या पत्नीच्या म्हणजे नवरी मुलीच्या घरी पोहोचण्यासाठी नवरदेव बर्फाने संपूर्णपणे झाकलेल्या भागातून वाट काढत जवळपास ४ किलोमीटरची वाट त्याने पार केली. 




वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप


गेल्या काही दिवसांपासून देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळालं. त्याच धर्तीवर या राज्यांमध्ये बर्फवृष्टीही सुरु झाली आहे. परिणामी येथील वाहतुकही विस्कळीत झाली आहे. अतीबर्फवृष्टीमुळे निर्धारित वेळेत ठरलेली कामं, विविध कार्यक्रमांमध्येही व्यत्य येत आहे. वऱ्हाड्यांसोबत खुद्द नवरदेव पाई जाण्याचा प्रसंगसुद्धाच त्याच परिणामांपैकी एक.