नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडामधील भाजपा आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे देखील निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आमदार सुरेंद्र सिंह जिना असं त्यांचं नाव आहे. ते अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट या मतदार संघातून निवडून आले होते.  त्यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन ह्रदयविकारामुळे झाले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमधील भाजपचा एक अनुभवी चेहरा म्हणून आमदार सुरेंद्र सिंह जिना यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तब्बल दोन आठवडे त्यांच्यावर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


सुरेंद्र सिंह यांच्या निधनामुळे समस्त उत्तराखंडमधील जनतेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भारतात गेल्या २४ तासांमध्ये  ४७ हजार ९०५ नव्या रुगणांची नोंद करण्यात आली असून ५५० रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या ८६ लाख ८३ हजार ९१७ वर पोहोचली आहे.