विचित्रपणा : भाजप आमदार कन्येच्या लग्न पत्रिकेवर राज्य सरकारचा लोगो
उत्तराखंडमध्ये भाजप आमदार कन्येच्या लग्न पत्रिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. वादाचे कारण असे की, या आमदार महोदयांनी कन्येच्या लग्न पत्रिकेवर चक्क राज्य सरकारचा लोगोच छापला आहे.
डेहराडून: उत्तराखंडमध्ये भाजप आमदार कन्येच्या लग्न पत्रिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. वादाचे कारण असे की, या आमदार महोदयांनी कन्येच्या लग्न पत्रिकेवर चक्क राज्य सरकारचा लोगोच छापला आहे.
लग्नपत्रिकेवर राज्य सरकारचा लोगो पाहून सर्वच अवाक
घटना आहे हरिद्वार येथील. सुरेश राठोड असे या आमदार महोदयांचे नाव असून, ते ज्वालापूर परिसरात राहतात. ते विधानसभेवर भाजपचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची मुलगी मोनिका हिचा उद्या (१० जानेवारी) विवाह आहे. तिच्या लग्नाची राठोड यांच्या घरी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, सर्वजन अवाक आहेत की, नेमका लग्नपत्रिकेवर सरकारचा लोगो कसा आला. फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, लोगो छापण्यात आले आहे आणि लोगोच्या खाली झारखंड सरकार असे लिहिले आहे. पत्रिकेच्या दुसऱ्या बाजूला राठोड यांची कन्या मोनिका आणि जावयाचे नाव छापले आहे.
सोशल मीडियातही ही पत्रिका भलतीच व्हायरल...
राज्य सरकारचा लोगो असलेल्या लग्न पत्रिकेबद्दल एएनआय नावाच्या वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारीत केले आणि एकच खळबळ उडाली. पाहता पाहता सोशल मीडियावरही ही लग्न पत्रीका भलतीच व्हायरलही झाली. लोकांनीही मग या आमदार महोदयांना चागलेच धारेवर धरले. अनेकांनी आमदारमहोदयांच्या या विचित्र आणि विक्षिप्तपणाची त्याच पद्धतीने नोंद घेत हल्ला चढवला.
आमदारांची कोणतीच प्रतिक्रीया नाही
नेटीझन्सनी तर सोशल मीडियावर या पत्रिकेची जोरदार खिल्ली उडवली. एका युजरने या पत्रिकेवरून टपली मारत 'लग्नासाठी जरूर या. पण, येताना 101रूपये आणायला विसरू नका' अशा आषयाची प्रतिक्रिया देत फिरकी घेतली.
दरम्यान, आमदार महोदयांकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.