नवी दिल्ली : मास्क न वापरता फिरल्यानं उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीला थोडाथोडका नव्हे तर तब्बल १० हजारांचा दंड भरावा लागलाय.. देवरिया मधील बरियारपूर भागातल्या महुआ या गावात ही घटना घडलीये. अमरजीत यादव असं या व्यक्तीचं नाव आहे.. मास्क वापणं बंधनकारक असूनही अमरजीत क्रेटा गाडीतून निवडणूक प्रचारासाठी निघाले होते.. यापूर्वीही त्यांना मास्क न वापल्यानं १ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र तरिही त्यांनी पुन्हा नियमांचा भंग केला.. त्यामुळे त्यांना १० हजारांचा दंड भरावा लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यूपीत लॉकडाऊन लावण्यास योगी सरकारने नकार दिलाय. यूपीतील 5 शहरात लॉकडाऊनचे लावण्याचे निर्देश अलाहाबाद हायकोर्टाने दिले आहेत. पण उपजिवीकेचं कारण पुढे करत यूपी सरकारने लॉकडाऊनला विरोध केलाय. यूपीत गेल्या 24तासातं 30 हजार 596 नवे रुग्ण आढळलेयत.


उत्तरप्रदेशातल्या 5 शहरामध्ये लॉकडाऊनचे निर्देश अलाहबाद हायकोर्टानं दिले. पण योगी सरकारनं जीवनासोबतच उपजिवीकाही महत्त्वाची आहे असं म्हणत लॉकडाऊनला विरोध केलाय. कुंभ मेळ्यानंतर उत्तरप्रदेशात रुग्ण झपाट्यानं वाढलेयत. 24 तासात 30 हजार 596 रुग्ण वाढलेयत. तर एका दिवसात 167जणांचा बळी गेला.तर लखनऊमध्ये 24 तासात 22 जणांनी जीव गमावला. 


रामनवमीसाठी भक्तांना बंदी
अयोध्येत रामनवमीसाठी भक्तांवर बंदी घालण्याचा निर्णय यूपी सरकारने घेतलाय. रुग्ण संख्येतल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. राम जन्मभूमी परिसरात भक्तांना मनाई करण्यात आलीय. तसेच  सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेयत.