भारतीय नौदलात भरती, ५६ हजार ते २ लाखांपर्यंत पगार
भारतीय नौदलामार्फत देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ५६ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी १ जुलै १९९९ ते २ जानेवारी १९९४ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
नवी दिल्ली : भारतीय नौदलामार्फत देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ५६ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९८ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
या पदांसाठी भरती :
ऑब्झर्व्हर
पायलट - एमआरव्यतिरिक्त
एअर ट्राफिक कंट्रोलर
पायलट - एमआर
अशी होईल निवड :
सर्व्हिस सिलेक्श बोर्डात (एसएसबी) झालेल्या मुलाखतीद्वारे उमेदवार निवडलले जातील.
एवढा मिळेल पगार :
उप लेफ्टनंट पदासाठी ५६,१०० ते १ लाख १० हजार ७०० रु.
लेफ्टनंट पदासाठी ६१ हजार ३०० ते १ लाख २० हजार ९०० रु.
लेफ्टनंट कमांडर पदासाठी ६९ हजार ९०० ते १ लाख ३६ हजार ९०० रु.
कमांडर पदासाठी १ लाख २१ हजार २०० ते २ लाख १२ हजार ४०० रु.
एकूण पदं :
१९ पदे
अशी आहे अट
यासाठी २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९८ दरम्यान जन्मलेले उमेदवार दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
४ मार्च २०१८