मुंबई : देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. पण आता डेल्टा व्हेरिएन्टवर कोविड लसही कमी प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर भविष्यात असे नवे म्यूटेशन देखील पाहिले जाऊ शकतात ज्याच्या विरूद्ध लसीचा प्रभाव कमी असू शकतो. परंतू सध्या कोरोनाला हारवण्यासाठी लस अधिक प्रभावी असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएन्ट जबाबदार असल्याचं मानलं जात आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड किंगडममधील तिसऱ्या लाटेचा प्रसारही डेल्टा व्हेरिएन्टमुळे वाढत आहे. आता डेल्टा व्हेरिएन्टमधील म्यूटेशननंतर डेल्टा प्लस व्हेरिएन्ट तयार होत आहे. डेल्टा प्लस हा प्रकारही भारतात पसरण्यास सुरुवात झाली आहे. 


महाराष्ट्र आणि केरळमध्ये देखील डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. आरोग्य  मंत्री  राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे 21 नवे रूग्ण आढळले असून केरळमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे जवळपास तीन रूग्ण समोर आले. 


डेल्टा व्हेरिएन्टवर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन किती प्रभावी? 
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन डेल्ट व्हेरिएन्ट विरोधात फार कमी एंटीबॉडी तयार करू शकतात, अशी माहिती इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या वैज्ञानिकांनी दिली. पण व्हॅक्सिन कोरोनाच्या इतर व्हेरिएन्टवर प्रभावी आहे.