मुंबई : गुजरातच्या वडोदरातील एका रूग्णालयात त्या कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे ज्याच्या पत्नीने हाय कोर्टाकडून आपल्या पतीचे स्पर्म एकत्रित करण्याची परवानगी मागितली होती. जेणेकरून ती आई बनू शकेल. तर 32 वर्षीय कोरोना रूग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो कोरोनाविरोधात लढाई लढत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रूग्णाची 29 वर्षीय पत्नीची Assisted reproductive technology (एआरटी) च्या माध्यमातून आई होण्याची इच्छा होती. तिच्या या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करताना हाय कोर्टाने रूग्णालयाला स्पर्मना संरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. 


रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वडोदऱ्यातील स्टर्लिंग रूग्णालयात कोरोनाच्या कारणाने 10 मे रोजी दाखल झाल्यानंतर एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशनवर ठेवण्यात आलेल्या व्यक्तीचं गुरुवारी निधन झालं आहे. स्टर्लिंग रूग्णालयातील नोडल अधिकारी डॉ. मयूर डोधिया यांनी सांगितलं की, या व्यक्तीचा मृत्यूचा न्यूमोनियाने झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा मृतदेह कुटुंबाला सोपवण्यात आला आहे. दरम्यान या व्यक्तीचे आई-वडिल आणि पत्नीने इन विट्रो फर्टिलाइजेशन (आईवीएफ) प्रक्रियेसाठी एआरटीसोबत पुढे जाण्याच्या प्रक्रियेला परवानगी देण्यासाठी गुजरात हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. रूग्णालयाने कोर्टाच्या आदेशाचं पालन करत  टेस्टिकुलर स्पर्म एक्सट्रैक्शन माध्यमातून स्पर्म जमा केले.


बुधवारी शहरातील एका स्पर्म बँकमध्ये त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं. यापूर्वी गुजरात हायकोर्टामध्ये पत्नीने सांगितलं होतं की, माझा पती 24 तासांपेक्षा अधिक काळ जीवंत राहू शकत नाही. यामुळे भविष्यात मला आई होण्यासाठी पतीचे स्पर्म्स संरक्षित करण्याची परवानगी दिली जावी. 


रूग्णाची तब्येत बिघडत असल्याचं लक्षात येता कोर्टाने रूग्णालयाला स्पर्म्स सुरक्षित करण्यासाठी निर्देश दिले. यासंदर्भात पुढील सुनावणी आज होणार असून पत्नीला मूल होण्यासाठी एआरटी प्रक्रियेतून जाण्याची परवानगी द्यावी की नाही याचा निर्णय न्यायालय घेईल.