Gujarat 1st Sologamy : प्रेम कुणीही कुणावर करावं असं आपण अनेकदा म्हणत असतो पण एखाद्याचं स्वत:चं स्वत:वरच निस्सिम प्रेम असेल तर ...असंत काहीस घडलं गुजरातच्या बडोदयाच्या क्षमा बिंदुच्या बाबतीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्षमा बिंदु ही 24 वर्षांची मुलगी. येत्या 11 जूनला तिचं लग्न होणार आहे..आणि तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. एकट्या राहणाऱ्या क्षमाचे दिवसातले आठ तास सध्या लग्नाच्या तयारीत जात आहेत. 9 जूनला तिचा मेंहदीचा कार्यक्रम होणार आहे  तर 11 तारखेला ती विवाह बंधनात अडकणार आहे. आणि पारंपारिक पध्दतीनं हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष


तर यात विशेष हे आहे की क्षमा स्वतच्याच विवाह बंधनात अडकणार आहे म्हणजे स्वत:शीच लग्न करणार आहे, एका बेव सिरिजमध्ये तिने प्रत्येक स्त्रीला नवरी व्हावंस वाटतं पण बायको व्हायचं नसतं अशा आशयाचं एक वाक्य तिने ऐकलं आणि त्यातून तिनं Sologamyचा अभ्यास सुरू केला.



लग्न करावं अशी लहानपणापासूनच इच्छा नव्हती. लग्न ही परंपरा तिला कधीच आवडली नसली तरीही नवरी होण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे तिनं स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या लग्नासाठी तीने जय्यत तयारी केली असून कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंतची सर्व गोष्टींची तिनं खरेदी केली आहे.


विशेष म्हणजे क्षमाने आपल्या लग्नाची निमंत्रणं पत्रिकाही तयारी केली आहे. मेंहदी समारंभ 9 जून रोजी तरलग्न 11 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. मेंदी समारंभासाठी क्षमा पांढरं धोतर आणि कुर्ता घालणार आहे तर हळदीच्या आणि लग्नाच्या दिवशी साडी नेसणार आहे. 


 


याचा अर्थ स्वतवर प्रेम करणं त्यातून तिनं निर्णय घेतला की लग्न करायचं पण स्वतशीच  केवळ लग्नचं नव्हे तर ती लग्नानंतर गोव्याला हनीमूनलाही जाणार आहे आणि ते ही एकटीच.