नवी दिल्ली : व्हॅलेंटाइन डेची धूम देशभरात आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी आजकाल फक्त तरुणच नाही तर विवाहितांमध्येही साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स या दिवशी आपल्या पर्टनरला दिली जातात. या दिवशी सर्वाधिक विक्री आणि खरेदी होते याचा अंदाज घेऊन बाजारातही वेगवेगळ्या ऑफर्स येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे बरेच जण ऑनलाईन पद्धतीनं खरेदी विक्रीही करतात. ऑनलाइन डेटिंग अॅपचाही सुळसुळा आला आहे. आता या सगळ्यात सायबर क्राइमची देखील भर पडली आहे. यंदा व्हॅलेंटाइन डे साजरा करताना जरा जपूनच साजरा करा. तुमची कोणतीही फसवणूक तर होणार नाही ना? याची पूर्ण काळजी घ्या. 


इंटरनेटवर अनेक प्रकारचे डेटिंग अॅप्स आहेत. त्याकडे आजची तरुणाई जास्त खेचली गेली आहे. या अॅपद्वारे बरेच लोक यामुळे फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


योग्य अॅप कोणतं हे ओळखणं गरजेचं


तुम्ही योग्य जोडीदाराची निवड करण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर करत असाल तर सावधान. तुम्हाला अलर्ट राहाणं गरजेचं आहे. त्याद्वारे तुम्ही फसवले जाऊ शकता. तुम्हाला योग्य डेटिंग अॅप ओळखणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. यासाठी तुम्ही रिव्ह्यू पाहू शकता. शिवाय गुगलवर दोन अॅपमध्ये तुलनाही करून पाहू शकता. 


प्रोफाईल तयार करताना ही काळजी घ्या


या अॅपवर प्रोफाईल तयार करताना तुमची सर्व माहिती भरू नका. अॅपवर नोंदणी करताना तुमचा बँकेशी लिंक असलेला नंबर अपलोड करणं टाळा. तुमचा ईमेल आयडी देणे टाळा आणि तुमचे सोशल मीडिया प्रोफाइल शेअर करू नका.


चुकूनही या गोष्टी करू नका


सोशल डेटिंग अॅपवर काहीवेळा आपण पैसे पाठवण्याचीही चूक करून बसतो. यामुळे तुमचं खातं धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टी करणं टाळा. कोणीही पैसे मागितले तर त्याला देऊ नका. 


काही फसवणूक करणारे लोक गडबड करतात. भेटण्यासाठी बोलवतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं गळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. कोणतीही गडबड करू नका. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा त्यासाठी स्वत: ला आणि नात्याला वेळ द्या.