Valentines Day Ratan Tata Love Story : आज व्हॅलेंटाईन डे (Valentines Day 2023) असल्याने आज बघावं तिकडे सगळीकडे गुलाबी वातावरण आहे. प्रत्येक जण प्रेमाच्या गोष्टी करत आहेत. आपल्या आयुष्यातील पहिलं प्रेम ते लव्ह मॅरेजपर्यंत अगदी अपूर्ण राहिलं प्रेमाबद्दलच्या आठवणीत रम्य आहे. तर काही जण नव्याने प्रेमात पडलं आहे. अशातच सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरीबद्दल (Celebrity Love Stories) जाणून घ्यायला सर्वसामान्यांना खूप आवडतं. रतन टाटा हे एक असं नाव आहे ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. आज संपूर्ण जग त्यांना ओळखतं. रतन टाटा (Ratan Tata Love Story) हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू तर नवल टाटा यांचे पुत्र ... उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील भारत सरकारने त्यांना 2000 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.  एवढा मोठा उद्योगपती असूनही जगभरात प्रसिद्धी मिळवूनही त्याने लग्न का केले नाही? त्याला मुलगी मिळाली नाही किंवा प्रेमात पडले नाही? 


चार वेळा प्रेमात पडूनही RatanTata सिंगल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अगदी खरं आहे की, रतन टाटा यांनी कधीही कोणाशी लग्न केलं नाही. असं नाही की त्यांनी कोणावर प्रेम केलं नाही. रतन टाटा 1-2 नव्हे तर 4 वेळा रिलेशनशिपमध्ये आले, पण एकदाही हे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. रतन टाटा यांनी स्वत: काही वर्षांपूर्वी आपली लव्हलाइफ जगासमोर मांडली होती. झालं असं की, काही वर्षांपूर्वी बडोदा मॅनेजमेंट असोसिएशन (BMA) च्या एका कार्यक्रमात रतन टाटा यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, ''आयुष्यात मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण चारही वेळा परिस्थिती अशी बनली की कोणत्या ना कोणत्या कारणाने लग्न होऊ शकले नाही.'' (Valentines Day RatanTata falling in love four times but he did not get married know his interesting love story mumbai news in marathi)


अमेरिकातील तरुणीच्या प्रेमात 


ज्यावेळी 1962 चे भारत-चीन युद्ध सुरू होते. तेव्हा रतन टाटा अमेरिकेत कामाला होते. तिथे ते एका अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडले होते. रतन टाटा त्या मुलीविषयी गंभीर होते. त्यांना लग्नही करायचं होतं. पण काही कारणामुळे रतन टाटा भारतात आले. युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे त्यांची मैत्रीण भारतात येऊ शकली नाही. मग त्यांच्यामध्ये दुरावा आला आणि पुढे त्या मुलीने दुसऱ्या मुलाशी लग्न केलं. 



बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात


शिक्षण पूर्ण करून रतन टाटा भारतात परतले तेव्हा ते येथील एका चित्रपट अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. या अभिनेत्रीचे नाव आहे सिमी ग्रेवाल (simi garewal) . दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि एकमेकांना डेट करत होते. याचा खुलासा खुद्द सिमी ग्रेवालने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पण काही कारणामुळे ही लव्हस्टोरी अधुरी राहिली.