vande bharat express : भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या रेल्वे विभागानं सातत्यानं प्रवाशांच्या सोयीनं काही गोष्टींची आणखी केली आहे. रेल्वेच्या सुविधांपासून ते अगदी रेल्वे प्रवासासाठीच्या तिकीटांचा दर असो. भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्याच अनुषंगानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इतकंच नव्हे, तर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे विभागाचे काही नियमही लागू आहेत. वंदे भारत रेल्वेसंदर्भातही हे बदल लागू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात महत्त्वाचं, वंदे भारत एक्‍सप्रेस (Vande Bharat Express) नं प्रवास करत असताना प्रवाशांनी काही नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे. पण, काही वेळा अशी परिस्थिती उदभवते, की प्रवाशांना कन्फर्म तिकीटही रद्द करावी लागते. रेल्वेचं तिकीट रद्द करत असताना यासाठीसुद्धा प्रवाशांकडून काही शुल्क आकारत त्यांना तिकीटाची उर्वरित रक्कम परत दिली जाते. 


कन्फर्म, आरएसी किंवा वेटिंग तिकीट रद्द केल्यास Indian Railway निर्धारित शुल्क कापत उरलेली रक्कम प्रवाशांना परत देते. तिकीट प्रवासाच्या किती वेळ आधी रद्द केली जाते यावरून हे शुल्क ठरतं. तिकीटासाठी कापल्या जाणाऱ्या रकमेत हे तिकीट नेमकं कोणत्या श्रेणीतील आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. एसी फर्स्ट, एसी चेअर आणि सेकंड क्लास अशा या श्रेणी तिकीट बुक करतानाच प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातात. 


वंदे भारत ही एक रिजर्व्ड क्लास एसी चेअर कार रेल्वे असून, ही रेल्वे ताशी 8000 किमी इतक्या वेगानं देशातील अनेक शहरांना जोडते. अशा या रेल्वेनं प्रवास करण्याच्या 48 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांकडून ठराविक शुल्क आकारलं जातं. एसी फर्स्ट क्लास आणि  एग्‍जीक्‍यूट‍िव क्‍लाससाठी ही रक्कम आहे 240 रुपये. तुम्ही जर प्रवास सुरु होण्याच्या 12 ते 48 तासांदरम्यान तिकीट रद्द केली, तर तिकीट दराच्या 25 टक्के रक्कम कापली जाते. यावर किमान शुल्कही आकारलं जातं. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : काश्मीरमध्ये बर्फाची चादर; महाराष्ट्रातील हवामानावर अनपेक्षित परिणाम 


रेल्वे अपेक्षित ठिकाणाच्या दिशेनं निघण्यापूर्वी 4 ते 12 तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास तिकीट रकमेच्या 50 टक्के रक्कम कापली जाते. शिवाय प्रवाशांकडून Cancellation Fee सुद्धा आकारली जाते. एखाद्या प्रवाशाकडे आरएसी श्रेणीतील तिकीट असल्यास आणि प्रवास सुरू होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना ठराविक रक्कम वगळता उर्वरित संपूर्ण रक्कम परत दिली जाते.