Vande Bharat Metro: वंदे भारत एक्स्प्रेसला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासन आता वंदे मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या विचारात आहे. कमी अंतर पार करण्यासाठी वंदे मेट्रो ट्रेनने प्रवास करता येणार आहे. या जुलै महिन्यात चाचणी सुरू होणार आहे. त्याचबरोबर, वंदे भारत स्लीपरची चाचणीही पुढील महिन्यात सुरू होणार आहे. वंदे मेट्रो ट्रेन 100-250 किमी अंतर शहरांदरम्यान ही वंदे मेट्रो ट्रेन चालवण्यात येणार आहे. तर वंदे भारत स्लीपर ट्रेन विविध मार्गावरील 1 किमीपर्यंतचे अंतर पार करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदे मेट्रो ट्रेनच्या माध्यमातून 124 शहर जोडण्यात येणार आहेत. लखनौ-कानपुर, आग्रा-मथुरा, दिल्ली-रावेरी, भुबनेश्वर-बालासोर, तिरुपती-चेन्नई या शहरांना जोडणार आहे. या एसी ट्रेन सध्या असलेल्या रुळांवरच धावणार आहेत. वंदे भारत मेट्रोचा मुख्य उद्देश हा दोन शहरांना कमी वेळेत जोडणे हा आहे. वंदे मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकिट आरक्षित करण्याची गरज नाही. साधारण मेट्रो प्रमाणेच ते येथे तिकिट काढून प्रवास करु शकतात. 


एका वंदे मेट्रो ट्रेनला 12 कोच असतात. त्याचबरोबर स्वयंचलित दारे आणि साइड सीट असणार आहेत. या सीट प्रवाशांसाठी आरामदायी असणार आहेत. तसंच, मेट्रोचे डबे अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. जेणेकरुन त्यात जास्त प्रवासी उभे राहू शकतील. एकाचवेळी जास्त प्रवाशी प्रवास करु शकतील. सध्या वंदे भारत मेट्रो 12 डब्यांची असेल. पण काळानुसार यात बदल 16 डबेही करण्यात येतील. पण 16 डब्यांची ही ट्रेन केवळ गर्दीच्या मार्गांवरच चालवली जाणार आहे. 
रिपोर्टनुसार, एका कोचमध्ये 280 लोक प्रवास करु शकतात. तर, आसन क्षमता 100 लोकांसाठी आहे. इतर लोक उभं राहून प्रवास करु शकतात. येणाऱ्या काळात 400 ट्रेन चालवण्याची योजना आहे. 


एका अहवालानुसार, भारतीय रेल्वे ट्रेनचे आधुनिकीकरण करु इच्छतात. सध्या वंदे मेट्रो ट्रेन 50च चालवण्यात येणार आहे. यात मागे व पुढे प्रत्येकी एक इंजिन असणार आहे. लांबच्या पल्ल्यासाठी परवडणाऱ्या दरात प्रवास घडणार आहे. पण तरीही वंदे मेट्रोचे तिकिट दर काय असतील याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. वंदे भारत मेट्रो मुंबईतही सुरू होण्याची शक्यता आहे.