वंदे भारत ट्रेनमध्ये विंडो सीट बुक केली पण मिळाली भलतीच सीट, तक्रार करताच प्रवाशाला आला असा अनुभव
Vande Bharat Train: वंदे भारत या ट्रेनचे तिकीटांची किंमत खूप जास्त आहे. अशातच एका प्रवाशांने एक्सवर पोस्ट करत तक्रार केली त्यानंतर अगदी कमी वेळात त्यावर रेल्वेचे उत्तर आले.
Vande Bharat Train: वंदे भारत ही भारतातील सर्वात प्रिमियम ट्रेनपैकी एक आहे. वंदे भारतचे तिकीटाचे दरदेखील जास्त आहेत. तर, आधीपासूनच या ट्रेनसाठी बुकिंग करावी लागते. एका प्रवाशाने वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी विंडो सीट बुक केली. मात्र त्याला ती सीट न मिळताच भलतीच सीट मिळाली. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरही याबाबत तक्रार केली. त्याच्या या तक्रारीवर रेल्वेने उत्तर दिलं आहे.
अभिजित आनंद असं या प्रवाशाचे नाव असून त्याने वंदे भारतमध्ये विंडो सीट बुक केली होती. मात्र त्याला कॉरिडोरमधील सीट मिळाली. सोशल मीडियावर आनंदने फोटो पोस्ट केली आहेत. यात तिकीट आणि सीटचे फोटोदेखील आहेत. यात स्पष्टपणे विंडो सीट बुक केल्याचा उल्लेख आहे. मात्र ती सीट कॉरिडोरमधील निघाली. अभिजीत आनंद यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सी 8 कोचमध्ये सीट नंबर 33 आणि 34 साठी खिडकी आणि कॉरिडोर सीट व्यवस्थेची तपासणी करण्याची गरज आहे. मला माझ्या सीटवरुन काहीच समस्या नाही. मात्र भविष्यात प्रवाशांसाठी असुविधेचे कारण ठरु शकते,
रेल्वेने केली कारवाई
आनंद यांनी एक्सवर तक्रार मांडल्यानंतर भारतीय रेल्वेने लगेचच प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वे प्रशासनाने एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. कृपया तुमचा नंबर डीएमसाठी देण्यात यावा. तुम्ही तुमची तक्रार थेट http://railmadad.indianrailways.gov.in देखील दाखल करु शकता किंवा 139 वर कॉल करु शकता.
40 मिनिटांत समस्या सोडवली
अभिजीत आनंद यांनी रेल्वेच्या कारवाईचे कौतुक केले आहे. त्याने म्हटलं आहे की, तुमच्या लगेचच आलेल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. दोन कर्मचारी आले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली सीटची व्यवस्था ठिक करुन दिली. भारतीय रेल्वेने 40 मिनिटांच्या आत ही समस्या सोडवली हे कौतुकास्पद आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस भारतातील एक सेमी हाय स्पीड ट्रेन असून त्यात आधुनिक सुविधा आहेत. यात पूर्णपणे एअर कंडिशन कोच, जीपीएस अधारित सूचना प्रणाली, आरामदायक सीट आणि ऑटोमॅटिक दरवाजे आहेत. 180 किमी प्रति तास वेगाने ही ट्रेन धावते. या ट्रेनमुळं दोन शहरांतील अंतरे खूप कमी होते.