वास्तूशास्त्रात झाडांसोबतच फुलांना देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच घरांमध्ये कोणती झाडं ठेवावीत कोणती ठेवू नये, घरांमध्ये कोणती फुलझाडं असावीत कोणती असू नये याबाबत वास्तूशास्त्राचा अभ्यास असणारे सल्ला देतात. आज, आपण अशाच एका फुलाबाबत बोलणार आहोत ज्याचं नाव पियॉनी असं आहे. ( Peony Flower). या फुलाला सर्वसाधारण भाषेत राणी फुल म्हणतात. या फुलाला फुलांची राणी देखील म्हणतात. घरात हे फुलझाड लावणं शुभ मानलं गेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकजण आपल्या बागेची शोभा वाढवण्यासाठी राणी फुलाच्या झाडाचा वापर करतात. अशात तुम्ही बागेत या फुलझाडाचा वापर करणार असाल तर प्रवेशदाराच्या उजव्या बाजूला हे झाड लावावं. उजव्या बाजूला हे फुलझाडं लावणं शुभ मानलं जातं 


सुखी वैवाहिक जीवनासाठी किंवा तुमच्या मुलांच्या सुखी आयुष्यासाठी तुम्ही हे फुलझाडं लावू शकतात. यासाठी तुम्हाला हे झाड घराच्या दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात लावायला सांगितलं जातं. याने घरात प्रसन्नता येते. यामुळे नवरा बायकोच्या नात्यातही गोडवा येतो. 


वास्तुनुसार कुणाच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा लग्न होण्यास उशीर होत असेल तर यातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. वास्तू शास्त्रानुसार हे फुल शुभ मानलं जातं. वास्तूनुसार हे फुलझाडं किंवा या फुलाचा फोटो तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये लावू शकतात. घरातील लग्नकार्य झाल्यानंतर तुम्ही हा फोटो कुणाला भेट म्हणूनही देऊ शकतात. 


राणी फुलाला सौंदर्य किंवा रोमान्स यांचं प्रतीक मानलं जातं. याने घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. ज्या घरात सारखे वादविवाद होतात. एकमेकांबरोबर भांडणं होतात अशा घरात आवर्जून राणी फुलाचा फोटो लावावा. या झाडाला दक्षिण पश्चिम दिशेला लावल्यास नात्यात गोडवा राहतो. ही दिशा कायम साफ आणि स्वच्छ ठेवा.  


वास्तू तज्ज्ञांच्या मते हे फुलझाडं घरात योग्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जात. या झाडामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. घरात या झाडाच्या वापराने मुलांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते. 


( विशेष नोंद - या बातमीतील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )


vastu tips solve marriage problem by using penoy flower plant in home