मुंबई : Vedant Fashions IPO: Vedant Fashions च्या शेअर्सची लिस्टिंग इश्यू प्राइजपेक्षा अधिक अंकांनी झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 8 टक्क्यांहून अधिक तेजीसह सुचिबद्ध झाला, त्यामुळे आयपीओ सबस्क्राइब केलेल्या गुंतवणूकदारांना बाजाराच्या अस्तिरतेतही मोठा फायदा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारंपारिक कपडे बनवणारी कंपनी वेदान्त फॅशनचा आयपीओ पूर्णतः ऑफर फॉर सेल होता. या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे जाणकारांच्या मते हा शेअर बाजारात येताना फ्लॅट किंवा नुकसानीसह सुचिबद्ध होईल. असा अंदाज वर्तवला होता. परंतू हे अंदाज फोल ठरवत हा शेअर 8 टक्के तेजीसह सुचिबद्ध झाला आहे.


वेदान्तचा आयपीओ 2.57 पट सबस्क्राइब झाला होता. तर त्यांची इश्यूप्राइज 866 रुपये इतकी होती.


किरकोळ गुंतवणूनकदारांनी या आय़पीओला अपेक्षित पसंती दिली नव्हती. तर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हा आयपीओ 7.50 पट भरला होता.