पणजी : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन निधन झाले. मृत्यूसमयी वाघ यांचे वय ५३ वर्षे होते. वाघ यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी आणि कोंकणी साहित्यिक विश्वाला तसेच राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला. वाघ हे २०१२ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून आले होते. ते प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपसभापती पदाची जबाबदारी आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विष्णू सूर्या वाघ यांचे निधन 8 फेब्रुवारी रोजी झाल्याचे वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी बुधवारी रात्री दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून जाहीर केले. वाघ हे गेल्या २०१६पासून आजारी होते. दरम्यान, उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. शरीर अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर होते तसे झाले होते. त्यावेळेपासून ते व्हिलचेअरला खिळून होते. 



वाघ यांच्या पत्नी अरुणा यांनी सांगितले की, दोन महिने वाघ हे दोनापावलो येथील मणिपाल रुग्णालयात होते. ते वारंवार आजारी पडू लागल्याने त्यांच्याच इच्छेनुसार केपटाऊन, जोहान्सबर्ग येथे त्यांना आपण नेले होते. तिथे त्यांना आराम मिळाला होता. ८ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. येत्या दोन दिवसांत त्यांचा मृतदेह गोव्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील, असे सांगण्यात आले.


मरण्यापूर्वीच्या काही सूचना



विष्णू सूर्या वाघ यांची कविता.