नवी दिल्ली : Vice Presidential Election 2022 : Jagdeep Dhankhar vs Margaret Alva : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे. यूपीएकडून मार्गारेट अल्वा तर एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. पण आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ठाकरे गट मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. 


नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील. प्रेफरेन्शिअल व्होटींग पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. संसदेचे सध्याचे संख्याबळ 788 आहे, जिंकण्यासाठी 390 पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे. भाजपच्या 303 सदस्यांसह लोकसभेत एनडीएचे 336 सदस्य आहेत. तसंच राज्यसभेत भाजपच्या 91 सदस्यांसह 109 सदस्य आहेत. एनडीएचे दोन्ही सभागृहात मिळून 445 सदस्य होत आहेत. 


एनडीएचे उमेदवार धनखड यांना वायएसआर, बीएसपी, टीडीपी, बीजेडी, एआयएडीएमके आणि शिंदे गट यांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे धनखड यांचा विजय जवळपास निश्चित आहे. धनखड यांना 515 मतं मिळण्याची शक्यता आहे.