मुंबई : लग्नाच्या वेगवेगळ्या चालीरिती असतात. जसे की, नवरा वरात घेऊन नवरीच्या घरी येतो. तेव्हा नवरीच्या घरातले लोकं नवऱ्याचे आणि त्याच्या सर्व कुटूंबीयांचे स्वागत करतात आणि त्यांना लग्न मंडपात घेऊन येतात आणि त्यांची खातीरदारी करतात. परंतु या एका लग्नात लोकांना काहीसं वेगळं दृष्य पाहायला मिळालं. ज्यामुळे या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण बऱ्याचदा भावनीक होतो आणि डोक्याचं ऐकण्यापेक्षा आपण कधीकधी आपल्या मनाचं ऐकतो आणि तसेच करतो. एका वधूने देखील आपल्या लग्नात असेच काही केली आहे. ही वधू नवरदेवची वरात दारात आली असताना बाकिच्या नववधूप्रमाणे बसून न रहाता ती स्वत: नवऱ्याचं स्वागत करायला आली आणि तिने नवऱ्याला हार घालून त्याचे स्वागत केले.


तिने नुसताच हार घातला नाही, तर हार घातल्यानंतर तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून आपल्या सर्व कुटूंहबीयांसमोर किस्स देखील घेतलं आहे.


तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हार घातल्यानंतर वधू नवऱ्याकडे तिचं कपाळ किस्स घेण्यासाठी पुढे करते, त्यानंतर तिचा होणारा नवरा देखील सगळ्यांसमोर तिला कपाळावर किस्स करतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वधू-वरांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य उमटल्या शिवाय राहाणार नाही. कारण आपल्या कुटूंबीयांसमोर यांनी आपलं एकमेकांप्रतीचे प्रेम व्यक्तं केलं आहे. त्यामु्ळे लोकं सोशल मीडियावर या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडपे म्हणत आहेत आणि त्यांच्यावर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.