मुंबई : खरेतर हा व्हिडिओ तासा फार जुना आहे. युट्यूबवरील माहितीनुसार साधारण २०१४ मध्ये युट्यूबवर अपलोड झालेला. पण, या व्हिडिओताली थरार आजही तितकाच कायम आहे. जितका ही घटना घडताना होता. हा व्हडिओ पाहताना आजही पाहणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात. तर, मग कल्पनाच करा की, ज्या व्यक्तिंसोबत ही घटना घडली त्यांचे काय झाले असेल? या व्हिडिओत चक्क हत्तीने बाईकला किक मारली आहे. अर्थात, किक निसटती गेली म्हणून नाहीतर बाईकचा जागेवरच चक्काचुर झाला असता. दुचाकीस्वाराच्या मूर्खपणामुळेच हा प्रसंग ओढवल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते. दुचाकीस्वारांचे त्या दिवशी नशीबरच थोर होते. म्हणून, दुचाकीवरील दोघांचेही जीव वाचले. अन्यथा, गजराजच त्यांच्यासाठी यमराज बनून आला होता. अर्थात, काळ आला होता पण, त्यांच्यासाठी वेळ आली नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्यूबवर असलेल्या या व्हिडिओबाबत फार माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडिओ नेमका कधी, कोठे, कोणत्या जंगलात शूट झाला असे तपशील मिळत नाहीत. केवळ अपलोड करणाऱ्या व्यक्तिचे नाव आणि अपलोड केल्याची तारीख दिसते. जासोप्रकाश देबास (Jasoprakas Debdas) नावाच्या व्यक्तिने हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे. पण, जंगलातील एका रस्त्यावर अचानक हत्ती येतो आणि रस्त्यावरील वाहतूकीचा खोळंबा होतो. पण, लोकही इतके विक्षिप्त की, जंगली प्राणाल्या रस्त्यावरून हटेपर्यंत आपण वाहतूक किंवा हालचाल करू नये इतकीही काळजी ते घेताना दिसत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून हत्ती बिथरतो आणि चक्क दुचाकीस्वारांवरच हल्ला करू पाहतो. शब्दांत अधिक काही वर्णन करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षच हा व्हिडिओ पाहू शकता...