नवी दिल्ली : ८ ऑक्टोबरला वायुदल दिन साजरा होत आहे. त्यासाठी जालंधरजवळील आदमपूर तळावर वायुदलाने सराव केला. वायुदल दिनाला होणारी वायुदलाची प्रात्यक्षिकं विख्यात आहेत. त्याचा सराव जालंधरजवळील आदमपूर तळावर करण्यात आला. विशेष म्हणजे अद्ययावत केलेलं आणि प्रगत स्वरूपातलं मिग २९ विमान यावेळी सादर करण्यात येणार आहे. या सरावात मिग नव्या रूपातलं अद्ययावत मिग २९ पत्रकारांना दाखवण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरूड कमांडो ही वायुदलाची नवी शान... काश्मीरातल्या दहशतवादविरोधी कारवायात नजीकच्या काळात गरूड कमांडोंनी मोठी कामगिरी बजावलीय. त्यांचंही सादरीकरण यावेळी होणार आहे.


एकाच वेळी दोन सीमांवर भारतीय वायुदलाची लढण्याची क्षमता आहे का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी त्या फेटाळत दोन्ही सीमांवर एकाचवेळी लढण्यात सज्ज असल्याचं सांगितलं.  


वायुदल दिनाला होणारा हा एअर शो डोळ्याचं पारणं दिपवणारा असतो. त्याची चुणूक या निमित्ताने पाहायला मिळाली.