Indore Girls Fight Video : आपण सोशल मीडियावर (Social media) महिला, तरुणींची फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ (women's free style fights Videos) आपण पाहिले आहेत. मुंबई लोकल ट्रेनमधील मारामारी असो किंवा रस्त्यावरील तरुणांचा राडा असो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत असलेल्या मुलींनी एकमेकांच्या कुणी एकमेकींचे केस ओढले, तर कुणी कपडे...


केस उपटून लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Girls Fight Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरे काय हे, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात मारुन घ्यायला. दारूच्या नशेत असलेल्या मुलींनी भररस्त्यात तुफान हाणामारी (drunken girls created ruckus on road) केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चार मुली एका मुलीला जबर मारहाण करताना (girls beat up one girl) दिसतायत. या चारही मुलींनी एका मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढंच नाही तर एका मुलीनं थेट बेल्टनंच पीडित मुलीला बेदम मारहारण केली. पबमध्ये झालेल्या वादातून ही हाणामारी झाली आहे. या चौघींनी ज्या मुलीला मारहाण केली ती नंतर बेशुद्ध पडली. (Video Indore Girls Fight viral on Social media nmp)



नाईट लाइफचा दुष्परिणाम


हा धक्कादायक व्हिडीओ इंदूरमधील (Girls Fight in Indore) आहे. इंदूरच्या एलआयसी चौकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दरम्यान पोलिसांनी या मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदूरमध्ये नाईट लाइफ सुरु झाल्यापासून अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाईटलाफला विरोध होतं आहे.