Trending News In Marathi:  बाल मजुरी हा कायद्याने गुन्हा असला तरी भारतातील अनेक ठिकाणी लहान मुलांकडून काम करुन घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हॉटेलमध्ये किंवा लोकलमध्येही मुलं सामान विकताना दिसून येतात. तसंच, प्लॅटफॉर्मवरही कधीकधी मुलं भीक मागताना दिसतात. तर अनेकदा रस्त्याच्या किनारी मुलं कचरा वेचतानाही दिसतात. पालकांची आर्थिक परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळं ही मुलं लहान सहान कामं करताना दिसतात. शाळा, शिक्षण सोडाच पण बालपणही या मुलांना अनुभवता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कचरा वेचणाऱ्या मुलाची एक तरुण मदत करतो. इतकंच नव्हे तर त्याला छान कपडे आणि जेवणही देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर नेहमी काहीना काही व्हायरल होत असते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक मुलगा कचरा वेचताना दिसत आहे. त्यावेळी एख व्यक्ती त्याच्याकडे जातो आणि त्याच्या मदतीसाठी पुढे येतो.तो मुलाला फक्त मदतच करत नाही. तर त्याच्यासाठी कपडे व जेवणही घेऊन देतो. या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या व्यक्तीचे कौतुक केले आहे. इतकंच, काय तर काहींनी त्याला देवमाणूसदेखील म्हटलं आहे. काय आहे या व्हिडिओत जाणून घेऊया. 


व्हिडिओच्या सुरुवातीला एक मुलगा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात चालताना दिसत आहे. मध्येच तो कचरादेखील वेचत आहे.त्याचवेळी एक व्यक्ती तिथे येतो आणि त्या मुलाला त्या कचऱ्याच्या ढीगापासून लांब घेऊन येतो. एका फुटपाथवर घेऊन आल्यानंतर स्वतःच्या हाताने त्याची चप्पल काढतो. त्यानंतर स्वत- त्याचे पाय पाण्याने धुतो. पाय धुतल्यानंतर त्याचे हात-पाय व चेहरादेखील स्वच्छ करतो. त्यानंतर मुलाला त्याच्याकडे असलेले नवीन कपडे देतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मुलाला नवीन कपडे दिल्यानंतर तो त्याला रिक्षातून हॉटेलमध्ये घेऊन जातो. तिथे त्याला भरपेट जेवणबही देतो. संपूर्ण व्हिडिओत मुलाच्या हातात एक तिरंगा असल्याचे पाहायला मिळतोच. व्हिडिओच्या शेवटी तो व्यक्ती मुलासोबत एक फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Help_by_god नावाने शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या असून लाइक्सही आले आहेत. 


एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, भाऊ तु खूप चांगलं काम करतोयस. तर अन्य एका युजरने म्हटलं आहे की, ऐकलं होतं की देवदूत असतात आज पाहिलं देखील. तर, तिसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, माझ्याकडे आज शब्द नाहीयेत. आणखी  एका युजरने म्हटलं आहे की, सोशल मीडिया जेव्हा पासून आलं आहे तेव्हापासून गरीब लोकांची मदत खूप सर्वसामान्य लोक करत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने गरीबाची मदत होतय, ही चांगली गोष्ट आहे. चांगलं काम करताहेत.