Belan Exercise Viral Video: स्थूलपणा हा जगभरामध्ये दिवसोंदिवस गंभीर प्रश्न होत चालला आहे. भारतामध्येही वाढत्या वजनामुळे अनेकांचं टेन्शन वाढलं आहे. बरं यामध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलाही वाढत्या वजनामुळे हैराण झाल्या आहेत. अनेकजण व्यायाम आणि डाएटच्या माध्यमातून वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी जीममध्ये तासन तास वेळ घालवतात. वजन कमी करण्यासाठी अगदी डान्सपासून ते पॉवर योगापर्यंत आणि पूल डान्सपासून ते मॉर्निंग वॉक अशा अनेक मार्गांचा अवलंब करताना दिसतात. अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात लोक वाटेल ते व्यायाम करतात. हे व्यायाम पाहून हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक बेलन एक्सर्साइजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


सोशल मीडियावर व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही महिला चक्क लाटणं घेऊन व्यायाम करताना दिसत आहेत. या महिलांनी केलेली कृती पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. या महिला आपल्या पोटावर लाटणं फिरवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये या महिला आपल्या पोटावर लाटणं वर खाली फिरवताना हसतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये काही पुरुषही हा व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम शिकवणाऱ्या दोन महिला एकमेकांभोवती फेर धरुन लाटणं पोटावर फिरवत नाचतानाची दुश्यही या व्हिडीओत दिसत आहेत. चिराग बरजातीया नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. "मी सांगतोय की या देशात फार स्कोप आहे," अशा कॅप्शनसहीत चिरागने हा व्हिडीओ शेअर केला आहे. म्हणजेच या देशात व्यायामाच्या नावाखाली तुम्ही काहीही खपवू शकता असं चिरागला म्हणायचं आहे. 



लोकांच्या मजेदार कमेंट्स


या ट्वीटखाली अनेकांनी मिम्स शेअर करत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. भारतात अनेकजण नकारात्म विचारांनी सकारात्मक बदल घडवायचा प्रयत्न करतात आणि अशा गोष्टी करु लागतात असं एकीने म्हटलं आहे. तर अन्य एकाने कोण आहेत हे लोक आणि कुठून येतात असं मिम शेअर केलं आहे. माकड आपले वंशज आहेत या सत्यामधून आपण कधीच बाहेर येणार नाही, अशी तिरकस प्रतिक्रिया एकाने नोंदवली आहे. लोकांना वेड्यात काढण्याची क्षमता तुमच्यात असेल तर काहीही अशक्य नाही, असं एका महिलेने कमेंट करुन म्हटलं आहे. पोटावरुन लाटणं फिरवून खरंच वजन कमी होणार आहे का? असा प्रश्न एकाने विचारला आहे. काहींनी हा काय वेडेपणा आहे असा प्रश्न विचारला आहे.