पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक, व्हिडिओ `झी २४ तास`च्या हाती
भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ `झी २४ तास`च्या हाती लागलाय.
नवी दिल्ली : भारतीय लष्करानं पाकिस्तान हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय. २९ सप्टेंबर २०१६ रोजी अतिशय गुप्तपणे झालेल्या या कारवाईचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये चार टार्गेट्स टिपताना दिसत आहेत.
जवानांकडे असलेल्या यूएव्ही आणि हेड माऊंटेड कॅमेऱ्यांमधून ही दृष्यं टिपण्यात आली आहेत. आतापर्यंत या सर्जिकल स्ट्राईकच्या सत्यतेबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. तसंच पाकिस्ताननं अशी कोणतीच कारवाई झाली नसल्याचा कांगावाही केला होता झी २४ तासच्या हाती आलेली ही दृष्यं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाकारणाऱ्यांना दिलेलं सडोतोड उत्तर आहे.