Video : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral
Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
UP News Poor Quality Roads : एका रस्त्याचा व्हिडिओ (Road video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे (Potholes) अनेकांचा बळी गेला आहे. तरीदेखील रस्त्या बांधकामात निकृष्ट दर्जाचं काम (Poor Quality Roads) झालं असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. गुजरात (gujarat election result 2022) आणि हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh Election Result 2022) कोणाचं सरकार येणार हे आज स्पष्ट होणार आहे. अशातच हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.
काय आहे नेमकं कारण?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती चक्क हातानेच रस्ता उखडताना दिसतं आहे. अतिशय निकृष्ट आणि खराब काम या रस्त्याचं झालं आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कामाची पोलखोल करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
हेसुद्धा वाचा - Google Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search
या व्हिडिओ या गावाजवळील एक स्थानिकाने व्हायरल केला आहे. (Video UP News deoria Poor Quality Roads viral on Social media)
कुठला आहे हा रस्ता ?
हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील असल्याचं बोलं जातं. हा व्हिडिओ रुद्रपूरच्या सावलियागंजपासून एकौना गावापर्यंत जाणारा भेडी गावाजवळचा आहे.
या रस्त्याचं काम पीडब्ल्यूडीकडून करण्यात आलं होतं. पण या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेल्याचा पोलखोल व्हिडिओ समोर आला. मग काय अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली आणि 100 ते 200 मीटपर्यंत रस्ता उखडून पुन्हा दुरुस्त करण्यात आला.