15 सेकंदात डुकराचा खेळ खल्लास, वाघाच्या टप्प्यात येताच... पाहा हा थरार
Tiger attacks a pig video viral : वाघाने जंगली डुकरावर हल्ला करुन त्याची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पाहू शकता, एक वाघ डुकरावर हल्ला करतो. त्यावेळी डुकराच्या मदतीला मगर धावून येते.(Crocodile went for help) पण...
मुंबई : Tiger attacks a pig video viral : आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. वाघाने जंगली डुकरावर हल्ला करुन त्याची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पाहू शकता, एक वाघ डुकरावर हल्ला करतो. त्यावेळी डुकराच्या मदतीला मगर धावून येते.(Crocodile went for help) पण...
या डुकराला वाघानं घट्ट पकडल्यामुळे त्याची सुटका होणं सहज शक्य नव्हतं. डुकराची सुटका करण्यासाठी मगरीनं वाघावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, या वाघाच्या ताकदीसमोर मगरीनंही गुडघे टेकले. वाघानं मगरीलाही झटका दिला. त्यामुळे पुन्हा या मगरीनं पुढं जाण्याचं धाडस केलं नाही. आणि या वाघानं डुकराची अखेर शिकार केली.
हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून राजस्थानच्या रणथंभोर नॅशनल पार्कातील असल्याचं बोललं जात आहे.