COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकोट : गुजरातमधील राजकोटमध्ये एका दलित मजुराला जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. या युवकाला मारहाण होत होती, तेव्हा मारू नका, म्हणून प्रचंड विनवण्या करत होता. तुम्ही आतापर्यंत प्राण्यांना मारहाण करणारे व्हिडीओ पाहिले असतील, पण या व्हिडीओत या माणसाला प्राण्यापेक्षाही बेहत्तर मारहाण करण्यात आली आहे, रादडिया इंडस्ट्रीजच्या लोकांनी चोरीच्या आरोपावरून या दलिताला बांधून मारहाण केली. या युवकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. आपल्या पत्नीसोबत हा ३५ वर्षाचा तरूण, फॅक्ट्रीच्या बाजूला कचरा जमा करत होता. या प्रकरणी ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या युवकाच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


मृत व्यक्तीचं नाव मुकेश वनिया असं आहे, तो ५ दिवसाआधीच आपल्या पत्नीसोबत काम शोधण्यासाठी राजकोटला आला होता. त्याला चोरीच्या आरोपावरून फॅक्टरीच्या गेटला बांधून मारलं अगदी जीवजाईपर्यंत मारलंय.मुकेशला मारहाण करताना हा प्रकार मोबाईलमध्ये शूट करण्यात आला, यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला, व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, एका माणसाने त्याला बांधलंय, तर दुसरा मारहाण करतो, तिसरा व्यक्तीही त्याच्यावर तुटून पडतोय.


या घटनेनंतर गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे, राजकोटमध्ये दलित मुकेश वनियाला फॅक्ट्रीच्या मालकांनी जीव जाईपर्यंत मारलंय, त्याच्या बायकोलाही खूप मारलंय, गुजरातमध्ये दलित सुरक्षित नाहीत, असं जिग्नेश मेवाणीने म्हटलं आहे.