VIDEO : जेव्हा मुलं वडिलांना गिफ्ट करतात बुलेट
पाहा हा व्हिडिओ
मुंबई : प्रत्येक बाप आपल्या मुलांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम कष्ट घेत असतो. आपल्याला जे मिळालं नाही किंवा आपल्याला जे मिळालं त्यापेक्षा अधिक चांगल आपल्या मुलांना मिळावं यासाठी बाप कायम झटत असतो. आईच्या प्रेमाची कायमच चर्चा होते पण बापाच्या कष्टाची चर्चा फार कमी होताना दिसते. मुलाच्या उत्तम शिक्षणापासून ते अगदी त्याला चांगली बाईक घेईपर्यंत बाप प्रयत्नशील असतो. मग त्याच्यासाठी कधी तो ओव्हर ड्युटी करतो तर कधी आपला खर्च कमी करून मुलाच्या बाईकसाठी पै आणि पै जमा करतो असं सगळं असताना जेव्हा मुलं आपल्या बापाला त्याच्या आवडती बुलेट गिफ्ट करतात तेव्हा....
पडला ना प्रश्न पण हे खरं आहे. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कुठचा आणि कधीचा आहे हे अद्याप कळलेलं नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन मुलांनी आपल्या वडिलांना बुलेट गिफ्ट केली आहे. मुलं वडिलांच्या डोळ्यावर ओढणी बांधून बिल्डिंग खाली घेऊन येतात. आणि तिथे त्यांना आपली बुलेट गिफ्ट करतात.
या व्हिडिओत ते गिफ्ट बघून वडिलं अगदी भावूक झालेले दिसत आहेत. असं सगळं असताना हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.