नवी दिल्ली : व्हिएतनामची VietJet एअरलाईन कंपनी त्यांच्या नावापेक्षा बिकनी एअरलाईन नावानंच प्रसिद्ध आहे. ही एअरलाईन कंपनी जुलै महिन्यापासून भारतात त्यांची सेवा सुरु करणार आहे. नवी दिल्लीपासून व्हिएतनामच्या चि मिन्ह सिटीपर्यंत ही विमानसेवा सुरु होणार आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या विमानसेवेला सुरुवात होईल. नवी दिल्लीपासून आठवड्याचे ४ दिवस विमान चि मिन्ह सिटीला जातील. महिला व्यावसायिक एनग्यूएन थी फुओंग थाओ या ही विमानसेवा चालवतात.


कोणी निवडला एअरलाईनचा ड्रेसकोड?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एअरलाईनच्या ड्रेसकोडची निवड कंपनीच्या सीईओ एनग्यूएन थी फुओंग थाओ यांनीच केली आहे. थाओ या व्हिएतनामच्या पहिल्या बिलियनएर महिला आहेत. ही एअरलाईन जगभरातल्या वादग्रस्त एअरलाईनमधील एक आहे. भारतामध्ये या एअरलाईनविरुद्ध हंगामा होऊ शकतो.


VietJet व्हिएतनामची पहिली खासगी एअरलाईन


VietJet ही व्हिएतनाममधली पहिली खासगी एअरलाईन आहे. २०१७ साली या विमानानं १.७ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे एअरलाईन कंपनीला जवळपास ९८६ मिलियन म्हणजेच ६४ अरब रुपयांपेक्षा जास्तचा नफा झाला होता. २०१६ सालच्या तुलनेत हा नफा ४१.८ टक्के जास्त होता.


६० मार्गांवर विमानसेवा


VietJet ची विमानं व्हिएतनाम आणि परदेशात मिळून ६० मार्गांवर सेवा देतात. २०२३पर्यंत २०० विमानं आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा कंपनीचा विचार आहे. एअरलाईन कंपनीनं डिसेंबर २०११ साली पहिली विमानसेवा सुरु केली होती. बिकनी कनसेप्ट आणि ड्रेसकोडमुळे VietJet लगेचच प्रसिद्ध झाली आणि व्हिएतनाममधली दुसरी सगळ्यात मोठी विमानसेवा देणारी कंपनी बनली.


सोशल मीडियावर टीका


वर्षाच्या सुरुवातीला VietJet वर जोरदार टीका झाली होती. एअरलाईननं फूटबॉल टीमचं स्वागत करण्यासाठी एअरहॉस्टेसना स्विमिंग कॉशच्यूममध्ये पाठवलं होतं.