नवी दिल्ली : भारतातून पळालेला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने बॅंकांकडून घेतलेले लोन काय केले असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याने या लोनचं काय केलं याचा खुलासा ईडीने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय माल्ल्याने त्याचे शौक पूर्ण करण्यात हे पैसे उडवल्याची माहिती आहे. ईडी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, माल्ल्याने फॉर्म्युला वनमध्ये बॅंकांकडून घेतलेले लावले होते. 


माल्ल्याने आयडीबीआय बॅंकेकडून घेतलेल्या लोनमधील एक भाग(५३.६९ कोटी रूपये) देशाबाहेर दोन वेळा फॉर्म्युला वन टीमला फंड करण्यासाठी पाठवले होते. लंडनमध्ये मनी लॉंड्रींग प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच त्याला जामीन मिळाला होता. याआधी एप्रिलमध्ये माल्ल्याला अटक करण्यात आली होती. तेव्हाही त्याला लगेच जामीन मिळाला होता. 


नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईडी अधिका-यांनी सांगितले की, आयडीबीआयकडून माल्ल्याने ९५० कोटी रूपयांचे लोन घेतले होते. त्यातील एक भाग त्याने ऑक्टोबर २००९ मध्ये लंडनला ट्रान्सफर केला होता. अधिका-यांच्या माहितीनुसार, त्याने हे पैसे फॉर्म्युला वनमध्ये लावले होते.  


अधिका-यांनी सांगितले की, पैसे बॅंक ऑफ बडोदाच्या किंगफिशर एअरलाऊन्सच्या अकाऊंटमधून फोर्स इंडियामध्ये ट्रान्सफर केले होते. २००८ मध्ये फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये उतरलेल्या फोर्स इंडिया टीमची मालकी संयुक्त रूपाने विजय माल्ल्या आणि तुरुंगात आलेल्या सहारा इंडिया परिवारच्या सुब्रोतो रॉय याच्याकडे होती.