अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विजय रूपाणी यांची निवड करण्यात आलीय. तर उपमुख्यमंत्रीपदाची माळ नितीन पटेल यांच्याच गळ्यात घालण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनिर्वाचित भाजप आमदारांच्या गांधीनगरमध्ये झालेल्या बैठकीत रूपाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 


या बैठकीसाठी दिल्लीहून पर्यावेक्षक म्हणून अर्थमत्री अरुण जेटली, ज्येष्ठ भाजप नेत्या सरोज पांडे, आणि भूपेंद्र यादव उपस्थित होते.


भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.