गांधीनगर : गुजरातमध्ये आज मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा सर्वांसाठी आश्चर्यचकित करणारा आहे. त्यामुळे आता प्रश्न उद्भवत आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आता गुजरातचा मुख्यमंत्री कोणाला करणार?.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर आता असे म्हटले जात आहे की, आज रात्री विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावली जाऊ शकते. ही बैठक गुजरात भाजप मुख्यालयात होणार आहे. भाजपच्या सर्व आमदारांना अहमदाबादला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीतच गुजरातच्या नवीन सीएमची घोषणा होऊ शकते. तूर्तास नितीन पटेल, मनसुख मांडवीया, पुरुषोत्तम रुपाला यांची नावे चर्चेत आहेत.


विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी म्हटले आहे की, भाजप पूर्वीही असे प्रयोग करत आली आहे. सत्ता बदलणे ही नवीन गोष्ट नाही. विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिला नसल्याची माहितीही रुपाला यांनी दिली. उलट, बऱ्याच काळापासून तयारी चालू होती आणि पक्षाने खूप विचार केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते, पाच वर्षांचा कार्यकाळ ही छोटी गोष्ट नाही.


विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांचा निर्णय तपशीलवार स्पष्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता त्यांना भाजप संघटनेत काम करायचे आहे. त्यांनी जेपी नड्डा यांना त्यांच्या इच्छेबद्दल माहितीही दिली आहे. त्यांची इच्छा आहे की आता ते भाजपला मजबूत बनवण्यासाठी योगदान देऊ शकतात.


गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. असे म्हटले जात आहे की निवडणुकीपूर्वी भाजपला नेतृत्व बदल हवा होता. अशा परिस्थितीत आता नव्या चेहऱ्यावर दाव लावण्याची तयारी आहे.