Upcoming IPO | पैसा ठेवा तयार; तुफान कमाई करून देणारे दोन IPO बाजारात येणार
सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी धमाकेदार असणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी 2465 कोटी रुपयांचे 2 आयपीओ खुले होणार आहेत.
मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी धमाकेदार असणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी 2465 कोटी रुपयांचे 2 आयपीओ खुले होणार आहेत. यामध्ये Vijaya Diagnostic Centre आणि Ami Organics या आयपीओचा सामावेश आहे. गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीची दमदार संधी आहे. दोन्ही इश्शु 3 सप्टेंबरपर्यंत खुले असणार आहेत जाणून घेऊ या कंपन्यांबाबत...
Vijaya Diagnostic IPO प्राइस बॅंड आणि लॉट साइज
विजया डायग्नोस्टिक सेंटरने आपल्या आयपीओसाठी प्राइस बँड 522-531 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. कंपनीच्या योजनेवर अपर प्राइस बॅंडवर 1895 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष आहे. 28 शेअर्सचा एक लॉट असणार आहे. कमाल 13 लॉट खरेदी करता येणार आहे.
हा आयपीओ पूर्णतः एक ऑफर फॉर सेल आहे. यामध्ये 3 कोटी 56 लाख 88 हजार 064 इक्विटी शेअर विकले जातील. आयपीओचे प्रमोटर सुरेंद्रनाथ रेड्डी, काराकोरम लिमिटेड, केदारा कॅपिटल अल्टरनेटिव इनवेस्टमेंट फंड तर्फे 35 टक्के हिस्सेदारी विकण्यात येणार आहे.
कोणाचे किती रिझर्व
आयपीओमध्ये 50 टक्के हिस्सा क्वॉलिफाइड इंस्टिट्यूशनल बायर्सचा आहे. 50 टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी असणार आहे. उर्वरित 15 टक्के नॉन - इंन्स्टिट्युशनल बायर्ससाठी राखीव असणार आहे.
Ami Organics IPO
या आयपीओसाठी 603-601 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आले आहे. आयपीओच्या माध्यमातून 570 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे लक्ष आहे. यामध्ये 24 लॉटचा एक शेअर असणार आहे. एक लॉटसाठी साधारण 14640 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.