कानपूर : कानपूर पोलीस हत्याकांडातील गुंड विकास दुबे अखेर पोलिसांशी झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. कानपूर ८ पोलीस हत्याकांड झालं होतं, यात गुंड विकासदुबे हा मुख्य आरोपी होता, त्याला पोलीस उज्जैनहून कानपूरला कोर्टात हजर करण्यासाठी नेत होते, त्या दरम्यान पोलिसांची गाडी ही महामार्गावर उलटली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास दुबे यांनी पोलिसांचं हत्यारं हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्या झटापटी दरम्यान गाडी उलटल्याचं सांगण्यात येत आहे.


यानंतर विकास दुबे यांने पळ काढताना पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात विकास दुबे हा ठार झाला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये विकास दुबेची ३० वर्षापासून जी दहशत होती, ती या चकमकीनंतर संपुष्टात आल्यासारखी आहे. विकास दुबेचं पोस्ट मॉर्टम देखील लगेच करण्यात येत आहे.



 विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू होती त्या दरम्यान पाऊस देखील सुरू होती. ही संपूर्ण माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे, अजून सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.