गोव्यात (Goa) पार्टीचे (Party) नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने ( Tourism Department) उघड्यावर अन्न शिजवणे, दारू पिणे (alcohol) यासारख्या कृत्यांवर बंदी घातली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दंडही (Ban) ठोठावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यात (Goa) पर्यावरणावर (environment) होत असलेल्या परिणामांमुळे हा आदेश जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्बंध काय आहेत?


सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात गोव्याच्या पर्यटन विभागाने मालवण (महाराष्ट्र) आणि कारवार (कर्नाटक) या राज्याच्या बाहेरील भागात जलक्रीडा स्पर्धेसाठी अनधिकृत तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. संचालक निखिल देसाई यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 'मोकळ्या ठिकाणी अन्न शिजविणे, कचरा पसरवणे, उघड्यावर दारू पिणे, बाटल्या फोडणे इत्यादींचा प्रतिबंधित कामांमध्ये समावेश आहे'.


याशिवाय पर्यटकांना अडथळा आणणाऱ्या आणि वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या अशा लोकांवरही बंदी घालण्यात येणार आहे. अधिकृत ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या पर्यटन उपक्रमांसाठी तिकीट विक्रीवरही बंदी असेल.


काय कारवाई होणार?


नियमांचे पालन न केल्यास 5000 रुपये दंड आकारला जाईल. जो 50 हजार रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तसेच आयपीसी कलम 188 अंतर्गत कारवाई होऊ शकते.


विशेष बाब म्हणजे 2019 मध्ये गोवा पर्यटन स्थळांमध्ये (संरक्षण आणि देखभाल) सुधारणा गोवा विधानसभेत मंजूर करण्यात आली होती. ज्यामध्ये दारू पिणे, उघड्यावर अन्न शिजवणे किंवा पर्यटन स्थळांवर बाटल्या फोडणे यावर बंदी होती. याशिवाय, शॅकसारख्या इतर ठिकाणी पर्यटकांना खाण्यापिण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार होते.